Prashant Kumar Yelai : रस्ते कामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही ; मक्तेदारांना ताकीद

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : शहातील सहा रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मक्तेदारांच्या माध्यमातून सुरू आहे. रस्ते कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याबाबत मक्तेदारालाही सक्त ताकीद देण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांतकुमार येळाई यांनी दिली.

शासनाने शहरातील रस्ते कामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून शहरातील रस्त्याची कामे करण्यात येत आहे. महापालिकेच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला काम देण्यात आले. बांधकाम विभागाने या कामासाठी निविदा काढून मक्तेदार नियुक्त केला आहे. या मक्तेदार यांच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहे.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात दहा रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. मात्र या कामाला विलंब लावत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातही ज्या दोन तीन रस्त्याचे काम मक्तेदाराने केले आहे. राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल रस्ते कामाची पाहणी करून त्याचा दर्जा चांगला नसल्याचा आरोपही केला आहे. (Superintending Engineer of Public Works Department Prashant Kumar Yelai warns monopolists no compromise on quality of road work Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Eknath Khadse : जिल्हा दूध संघ प्रकरणात रिट याचिकेचे मुद्दे ग्राह्य

याबाबत माहिती देताना श्री. येळाई म्हणाले, की महापालिकेने आम्हाला केवळ सहा रस्त्याच्या कामाबाबत आम्हाला ‘एनओसी’ दिली आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौक, कालिका माता मंदिर ते खेडी, शिवाजी नगर पूल ते सिटी दूध फेडरेशन व सिटी कॉलनी रस्ता, आणि लांडोरखोरी मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे कार्पेट पर्यंत काम आले आहे. या रस्त्यावर लवकरच कार्पेट टाकण्याचे कामही करण्यात येईल.

रस्ते कामावर दररोज देखरेख

रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी दररोज या रस्त्याच्या कामाची देखरेख करण्यात येत असल्याची माहिती येळाई यांनी दिली, त्यांनी सांगितले, झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर अभियंता त्याची पाहणी करतात, त्यानंतर त्या कामाचा अहवाल ते सादर करत असतात, त्यामुळे रस्ते कामाचा दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही तडजोड करीत नाही. याबाबत आम्ही कामाच्या मक्तेदारालाही सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याचे काम याची आपण ग्वाही देतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon : सिका E motorsच्या Smack high speed electric scooterचे अनावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com