Jalgaon News : समांतर रस्त्यासाठी 40 कोटी मंजूर : सुरेश भोळे

शहरातील समांतर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यासाठी चाळीस कोटींचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.
fund
fundsakal

Jalgaon News : शहरातील समांतर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यासाठी चाळीस कोटींचा निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जळगाव शहराच्या विकासाला दिशा देण्याच्या प्रश्‍नावर चर्चा होऊन निधीसह इतर तांत्रिक मार्गही मोकळे झाले आहेत, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Suresh Bhole statement of 40 crore sanctioned for parallel road jalgaon news )

नागपूर येथे नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनात जळगाव शहराच्या प्रश्‍नाबाबत माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी माहिती देताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की शहरातील बांभोरी ते नशिराबाद भागापर्यंतच्या समांतर रस्त्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

त्यासाठी आणखी काही निधी शासनाकडे मागण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२३-२४ अंतर्गत गिरणा पंपिंग स्टेशन येथे सुशोभीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे बहिणाबाई महोत्सवाकरिता दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पंतसंस्थांची अवस्था बिकट असल्याने पतसंस्था ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यावर चर्चा करण्यात आली. त्यांच्या ठेवी तत्काळ परत कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

‘एमआयडीसी’त फायर स्टेशन

जळगाव येथील एमआयडीसीत फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेच्या पाण्याच्या सोई पुरविण्यात येणार आहे. तसेच नवीन रोजगार उपलब्ध होण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवीन उद्योगाचे प्रकल्प आणण्यात येणार आहेत.

fund
Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात मिळणार सातवा वेतन आयोग

‘एमआयडीसी’त एकच कर लागणार

औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून एमआयडीसी विभाग, तसेच महापालिका यांच्याकडून दोन स्वतंत्र कर वसुल करण्यात येतात. त्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. एमआयडीसी ही स्पेशल प्लॅनिंग ॲथॉरिटी असून, संबंधित कर एमआयडीसी यांनीच वसुल करून उद्योजकांना सोयी पुरवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मनपा कर्मचाऱ्यांना सातवे वेतन

महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावरही चर्चा करण्यात आली. यात मनपा कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यासह कालबद्ध पदोन्नती द्यावी, तसेच बारा रोजंदारी कर्मचारी २५ वर्षांपासून मनपा सेवेत कार्यरत असून, त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली.

लवकरच त्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. याशिवाय गाळेधारकांचा प्रश्‍नही लवकर सुटणारा आहे. या वेळी माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे, जनसंपर्क विभागाचे मनोज भांडारकर, मुविकोराज कोल्हे उपस्थित होते.

fund
Jalgaon News : भुयारी गटारी प्रकल्प जानेवारीत; प्रतीक्षा संपली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com