
जळगाव : बेपत्ता तरुण कुटुंबीयांच्या स्वाधीन
जळगाव : रायपूर कुसुंबा (ता. जळगाव) येथील मनोरुग्ण तरूण बुधवारी (ता. ३) रात्रीपासून बेपत्ता झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी शोध घेऊन त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अमरिश दास असे तरुणाचे नाव आहे. (Surrender to family of missing youth Jalgaon Latest Marathi news)
हेही वाचा: 2 दिवसात साडेतेरा हजार तिरंग्याची विक्री; NMC कर्मचाऱ्यांना खरेदी बंधनकारक
अमरिश दास हा आपल्या कुटुंबीयांसह जळगाव तालुक्यातील रायपूर येथे राहतो. काही दिवसांपासून त्याच्या मेंदूवर परिणाम झाल्याने कुणाला काहीही न सांगता तो, बुधवारी रात्री ११ वाजता घरातून निघून गेला होता.
त्याच्या नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही आढळला नाही. कुटुंबीयांनी पोलीसात धाव घेऊन खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी इम्तियाज खान यांनी या तरुणाला मास्टर कॉलनी, जळगाव येथून शोधून आणत त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
तरुण मुलगा बेपत्ता झाल्याने हैराण झालेल्या कुटुंबीयांना मुलगा परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिरेबंदी प्रवेशद्वार उघडणार!
Web Title: Surrender To Family Of Missing Youth Jalgaon Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..