Latest Marathi News | दहशत माजविणाऱ्याला तलवारीसह अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime news

Jalgaon Crime Update : दहशत माजविणाऱ्याला तलवारीसह अटक

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

सुप्रीम कॉलनीत रामदेवबाबा मंदिराजवळ एक तरुण बेकायदेशीर तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली. (Terrorist arrested with sword Jalgaon Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Political News : राजकीय संघर्षात नात्याची बदनामी का?

त्यावरून त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील, किरण धनगर यांनी दुपारी दोनला संशयित समीर समशेर तडवी (वय २०, रा. सुप्रीम कॉलनी) याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ असलेली चार हजार रुपयांची २८ इंच लांबीची तलवार मिळून आली. पोलिस नाईक किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित समीर समशेर तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोघांना अटक