Latest Marathi News | घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary Case

Jalgaon Crime News : घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

जळगाव : भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात घरफोड्या, चोरीसह इतर गुन्ह्यांत तरबेज असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. या टोळीतील दोन संशयितांना अटक केली. त्यांनी अनेक गुन्ह्यांच्या कबुलीसह साथीदारांची नावे सांगितली आहेत.

शहरासह जिल्ह्यात घरफोड्या, चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होत असताना, जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखेची स्वतंत्र बैठक घेत गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक किशन नजनपाटील यांच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू होता.(Two arrested in crime of burglary Jalgaon Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Jalgaon Political News : राजकीय संघर्षात नात्याची बदनामी का?

मुळ भुसावळ शहरातील बहुतांश संशयित असलेल्या एका टोळीची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने शेख शकील शेख सलीम (वय २६,रा. पंचशीलनगर, भुसावळ), आसीफ शेख अकबर (३२, मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी यावल येथील घरफोडीसह पहूर येथील घरफोडी, जळगाव एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये झालेल्या चोऱ्यांची कबुली दिली. सोबतच ॲल्युमिनिअमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्यांच्या टोळीतील साथीदार वसीम अहमद पिंजारी, चँपियन श्‍याम इंगळे, श्‍याम सुभाष शिरसाठ ऊर्फ अब्दुल गफूर (पापानगर भुसावळ), आवेश अहमद पिंजारी यांच्यासोबत केलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती संशयितांनी दिली असून, अटकेतील दोघांना पुढील तपासासाठी यावल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हेही वाचा: Jalgaon News : प्रस्तावित न्यायालयाच्या जागेवर सट्ट्याचा अड्डा दिमाखात