महानगरपालिकेला चपराक; दावा चालविण्याचा स्थानिक न्यायालयास अधिकार

महानगरपालिकेला चपराक; दावा चालविण्याचा स्थानिक न्यायालयास अधिकार
Aurangabad High Court Bench
Aurangabad High Court Benchsakal

जळगाव : शहरातील दुरवस्था झालेल्या रस्तेप्रश्‍नी(bad roads in jalgaon) जिल्हा न्यायालयात दाखल प्रातिनिधिक दाव्यात नोटिशीला अथवा दाव्यालाही उत्तर न देणाऱ्या महापालिकेने (jalgaon carporation)हा दावा रद्द करण्यासाठी दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. विशेष म्हणजे, प्रतिवादी म्हणून कुणालाही नोटीस न बजावता हायकोर्टाने अपील फेटाळल्याने मनपा प्रशासनासह यंत्रणेला ही मोठी चपराक असल्याचे मानले जात आहे, अशा प्रश्‍नांमध्ये स्थानिक न्यायालयातही कामकाज चालू शकते, यावर हायकोर्टाने एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.(The aurnagabad High Court bench rejected the appeal on the road issue)

Aurangabad High Court Bench
जळगाव : महासभेत ४२ कोटींच्या विकासकामांना भाजपने दिली एकमताने सहमती
Aurangabad High Court Bench
गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरुवारी कठोर निर्णय; गुलाबराव पाटील

जळगाव शहरातील रस्त्यांची(bad roads) गेल्या तीन- चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. नागरिकांना त्यामुळे अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत असून त्यासंदर्भात ॲड. प्रदीप कुळकर्णी यांनी येथील दिवाणी न्यायालयात प्रातिनिधिक दावा (क्र. २५२/२०२१) दाखल केला आहे. त्यावर न्या. एस. एन. फड यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुरवातीला यासंदर्भात जळगावचे महापौर, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव आदींना पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीला कुणीही उत्तर दिले नाही. दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने आदेश बजावूनही मनपाने म्हणणे मांडले नाही.

Aurangabad High Court Bench
जळगाव : कोरोना व्हेरिएंट बदलला; उपचारही बदलले

नागरी प्रश्‍नावर उदासीनता

एवढ्या गंभीर विषयांवर नोटिशीला उत्तर न देता उलट जिल्हा न्यायालयात दाखल हा दावाच रद्द करण्याचा अर्ज मनपाच्या वतीने वकिलांनी दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मनपाच्या वतीने ॲड. एल. व्ही. संगीत यांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या(MUMBAI HIGH COURT) औरंगाबाद खंडपीठात(aurngabad high court bench) अर्ज करून हा दावा रद्द करण्याची विनंती केली. अशाप्रकारचे जनहित याचिकेवर आधारित दावे स्थानिक न्यायालयाला चालविण्याचा अधिकार नाही, या कारणाखाली हा दावा रद्द करण्याची मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली.

जिल्हा न्यायालयात चालेल दावा

मात्र, न्या. मंगेश एस. पाटील यांच्या पीठाने प्रतिवादींना नोटीस न काढता मनपाचे हे अपील फेटाळून लावले. हे अपील फेटाळल्याने अशा प्रश्‍नांवर स्थानिक न्यायालयातही(district court jalgaon) दावा चालू शकतो, यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया ॲड. प्रदीप कुळकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com