The Burning Truck : जळगावात महामार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार; टायर फुटल्याने आग; चालक-क्लीनरने वेळीच उड्या घेतल्याने बचावले

जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावरील पाळधी ते तरसोद वळणमार्गावर (बायपास) धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली.
The Burning Truck on jalgaon Highway

The Burning Truck on jalgaon Highway

sakal

Updated on

जळगाव - शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावरील पाळधी ते तरसोद वळणमार्गावर (बायपास) धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास घडली. महामार्गावर सुसाट वेगात ट्रकचा टायर फुटल्याने लागलेल्या या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे रौद्र रूप पाहताच ट्रकचालक आणि क्लीनर अशा दोघांनी धावत्या ट्रकममधून एकामागून एक उड्या घेत स्वतःचे प्राण वाचविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com