जळगाव : जिल्ह्यात दोन वर्षांत २८ हजार मतदार वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voters

जळगाव : जिल्ह्यात दोन वर्षांत २८ हजार मतदार वाढले

जळगाव : जिल्ह्यातील मतदारांची नवीन मतदार यादी जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. त्यात २०१९ च्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल २८ हजार १११ मतदार वाढले आहे. त्यात ८ हजार ७९ सैनिक मतदार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मतदार याद्या अपडेट करण्याचे काम निवडणूक विभागातर्फे सुरू होते. त्यात नवीन मतदार नोंदणी करणे, चुकीचे फोटो, नावे, पत्त्यात बदल करण्याची कामे करण्यात आली. दुबार नावे असतील तर ती वगळण्यात आली.

हेही वाचा: जळगाव : तिसऱ्या लाटेतील बाधितांमध्ये लक्षणे सौम्य

ज्यांची छायाचित्रे नाहीत अशांची छायाचित्रे मतदार याद्यात टाकण्यात आली. गावोगावी ग्रामसभा घेऊन दुबार नावे, चुकीचे नावे काढण्यात आली आहेत. याकामी बीएलओेंची मोठी मदत झाली. गावोगावी झालेल्या ग्रामसभांना नागरिकांनी सतर्कता दाखवून शहरी व ग्रामीण भागात असलेली एकाच व्यक्तीचे नावे काढण्यास मदत केली आहे. सर्व मतदार याद्यांतील हरकती, दाव्यांवर निकाल देत अंतीम मतदार याद्या जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केल्या. त्यात जिल्ह्याची मतदार संख्या आता ३४ लाख ८९ हजार २५२ एवढी आहे. ही मतदार यादी आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पालिका, महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonelectionVoters
loading image
go to top