कुंचल्यानूतन चितारल्या ‘लॉकडाऊन’च्या कथा

‘लॉकडाऊन’च्या एक ना अनेक अनुभवांच्या कथांना आपल्या कुंचल्यातून साकारलेय विख्यात चित्रकार सचिन मुसळे यांनी.
Painting
Paintingesakal
Updated on: 

जळगाव : दोन वर्षांपूर्वीचा कोरोनाचा (Corona) प्रारंभिक काळ.. अचानक लागलेले लॉकडाऊन (Lockdown).. क्षणात सर्व ठप्प.. रस्त्यांवर धडकी भरविणारी शांतता.. थकल्या-भागल्या चेहऱ्यांनी महामार्गावरून जाणारे स्थलांतरित मजूर.. माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देणारे जेवणाचे स्टॉल्स.. आणि या संचारबंदीला न जुमानता मोकाट फिरणारे काही महाभाग.. अशा एक ना अनेक अनुभवांच्या कथांना आपल्या कुंचल्यातून साकारलेय विख्यात चित्रकार सचिन मुसळे यांनी.

लॉकडाऊनच्या काळात खरेतर अनेकांचा रोजगार गेला, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल झालेत.. काय करावे? या प्रश्‍नावर बहुतांश पीडितांकडे उत्तरच नव्हते. कलाक्षेत्रालाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. अनेकांना नैराश्‍य आले.. मात्र, या नैराश्‍य, तणावातून काहींनी संधी शोधली, त्यांना मार्गही सापडला. सचिन मुसळे हे गुणी चित्रकार त्या मालिकेतील एक पात्र.

Painting
अडचणी झुगारत उभारला राजमार्ग...

अनेक कथा चितारल्या

लॉकडाऊनच्या काळातील त्यांचा व्यक्तिगत अनुभवही फार वाईट. त्यांचा चांगला चालणारा व अनेक चित्रकार घडविणारा ड्रॉइंग क्लास बंद पडला.. पण, त्यातून स्वत:ला सावरत त्यांनी याच काळातील अनुभवांना कॅनव्हासवर बोलतं केलं.. रस्त्यावरील स्मशान शांतता दर्शविणाऱ्या संचारबंदीपासून स्थलांतरित मजुरांचं जगणं, ज्येष्ठ नागरिकांची बाहेर पडण्यासाठीची तगमग, कोरोनाच्या दहशतीतही कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्यकर्मी, पोलिस, सुरक्षाजवान अन्‌ स्वच्छता कर्मचाऱ्यांची समर्पित सेवा यासारख्या अनुभवांवर आधारित त्यांनी काही चित्रे साकारलीत.

आयएएस अधिकाऱ्यांचे ट्रेनर

फार कमी कलावंतांना मिळते, अशी संधी सचिन मुसळेंना मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले. आयएएस अधिकाऱ्यांसाठी मसुरीत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सलग तीन वर्षे प्रत्येकी तीन महिने असे जवळपास ८-१० महिने प्रशिक्षण दिलेय. तेथील अनुभव भन्नाट असल्याचे मुसळे सांगतात.

Painting
‘दिवस माउंट एव्हरेस्ट’चा!

''लॉकडाऊनच्या काळातील बऱ्या- वाईट अनुभवांच्या ३० ते ३५ चित्रांची ही मालिका आता पूर्णत्वास येतेय.. लवकरच या चित्रमालेचे मुंबई- पुण्यात प्रदर्शन भरविण्याचे नियोजन आहे.'' - सचिन मुसळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com