खिडकी तोडून चोरांनी प्रवेश केला; सीसीटीव्ही कॅमेरा तोडले, तरी बँकेची तिजोरी सुरक्षीत !   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खिडकी तोडून चोरांनी प्रवेश केला; सीसीटीव्ही कॅमेरा तोडले, तरी बँकेची तिजोरी सुरक्षीत !  

पोलिसांनी श्र्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला.

खिडकी तोडून चोरांनी प्रवेश केला; सीसीटीव्ही कॅमेरा तोडले, तरी बँकेची तिजोरी सुरक्षीत !  

पाचोरा : येथील भडगाव रोड वरील निर्मल सिड्स समोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा मध्ये मध्यरात्री बॅंकेची खिडकी काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बॅंकेतील विज पुरवठा बंद करून, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीसीआरच्या केबल तोडून रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे तिजोरी पर्यंत पोहचू शकले नाहीत.

वाचा- सीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली; शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्याने वाढताहेत भाव
 

भडगाव रोडवरील बँक ऑफ बडोदा मध्ये मध्यरात्री चोरांनी  चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतू तिजोरीच्या सुरक्षीत उपायोजनामूंळे चोरांना खाली हात परत जावे लागले. हा सगला प्रकार सकाळी बँकेत कर्मचारी आल्यावर निदर्शनास आला' बँकेतुन कुठल्याही प्रकारची रोकड चोरी गेलेली नसली तरी सुमारे 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
 

आवश्य वाचा- अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले आणि गुरूजी मोहात अडकले; मग काय, जे व्हायचे होते तेच झाले ! 
घटनास्थळी पोलीस

घटनास्थळी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी तत्काळ येवून पाहणी केली. चोरीच्या प्रयत्नाच्या घटनेची माहिती बॅक व्यवस्थापक विकास शर्मा यांनी पाचोरा पोलीसात दिली. असता पोलिसांनी श्र्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top