Latest Marathi News | धरणाच्या लोखंडी प्लेटची चोरी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon News : धरणाच्या लोखंडी प्लेटची चोरी; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर/कळमसरे : पाडळसरे (ता. अमळनेर) येथील धरणाचे काम हे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. कळमसरे -मारवड दरम्यान रस्त्यालगत एका शेतात लोखंडी गेट बनविणे सुरू आहे. येथील लोखंडी गेट चोरी झाल्याने मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर - नीम रस्त्यावरील कळमसरे शिवारातील रस्त्यावरील गट क्रमांक १३७ मधील शेतात पाडळसरे धरणाच्या कामासाठी लागणारे लोखंडी गेट तयार करण्याचे काम सुरू आहे. बऱ्याच वर्षांपासून धरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने हे लोखंडी गेट त्या ठिकाणी शेतात पडून आहेत. (Theft of dam iron plate Filed a case in police station Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

दरम्यान, गुरुवारी (ता. २९) चोरट्यांनी ४ लाख ६४ हजार ९४० रुपये किमतीच्या १६ टन लोखंडाच्या २८७ प्लेट्सची चोरी केली. या प्रकरणी येथील सुपर वायझर दिनेश चौधरी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षितेविषयी प्रश्‍नचिन्हे

मागील तीन वर्षांपूर्वी येथे डिझेल, डीपी चोरीला गेल्याची घटना घडली होती. तर बऱ्याच वेळा किरकोळ वस्तू चोरीला गेल्या आहेत. आता लोखंडी प्लेट चोरीला गेल्याने एकूणच सुरक्षिततेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून यंत्रणा काय करीत होती, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेचा सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : तत्कालीन 3 तहसीलदारांवर गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल

टॅग्स :Jalgaoncrimedam