Jalgaon : सोनगावात दीड लाखाच्या पशुधनाची चोरी

jalgaon crime Marathi News
jalgaon crime Marathi Newsesakal

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील सोनगाव शिवारात एकाच्या शेतातल्या पत्राच्या शेडमध्ये बांधलेल्या गाय, चार बैल व गोरा (Livestock) असा एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून (Stolen) नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of one half lakh livestock in Songaon Jalgaon Latest Crime Marathi News)

याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी ममराज भाईदास जाधव (वय-३०) हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांची सोनगाव शिवारात स्वतःच्या मालकीची जमीन आहे. शेतीत पशूंना बांधलण्यासाठी शेड बनविलेले असून त्यात नेहमी एक गाय, चार बैल व गोरा असे खुट्टाला बांधलेले असतात.

दरम्यान गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ममराज जाधव यांनी मंगळवार, १२ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जनावरांना चारापाणी करून झोपण्यासाठी घरी निघून गेले.

jalgaon crime Marathi News
उमा पार्क भागातील पूल खचण्याची भीती; नागरिकांनी अडथळे टाकून रस्ता केला बंद

बुधवार रोजी सकाळी पहाटे ३ वाजता शेतात आले असता त्यांना २५ हजार रुपये किमतीची गावरान जातीची एक गाय, १ लाख वीस हजार रुपये किमतीचे काळे व तपकिरी रंगाचे चार बैल व योगेश गुलाब जाधव यांच्या मालकीचा १५ हजाराचा गोरा असा एकूण १, ६०,००० रुपये किमतीची जनावरे दिसून आली नाही.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी ममराज यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु वरील जनावरे मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याचा स्पष्ट झाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून ममराज जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोहेकॉ नितीन सोनावणे हे करीत आहे.

jalgaon crime Marathi News
नाशिक : जुने वाडे कोसळण्याच्या घटना सुरूच; मंगळवारी 3 वाडे कोसळले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com