Jalgaon News : पेन मागून वॉचमनचा मोबाईल लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mobile thief

Jalgaon News : पेन मागून वॉचमनचा मोबाईल लंपास

जळगाव : मोबाईल नंबर लिहून घेण्यासाठी पेन मागून चोरट्याने वॉचनमचा मोबाईल (Mobile) घेऊन पोबारा केल्याची घटना प्रतापनगर येथे घडली. पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (thief stole mobile of watchmen by asking for pen jalgaon crime news)

जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात प्रतापनगरमध्ये गोकूळ स्वीट मार्ट चौकात राजेंद्र पुंडलिक चव्हाण यांचे मालकीचे नवीन बांधकाम सुरू आहे. याठिकाणी वॉचमन म्हणून दीपक नानू पवार (वय ४२) कामाला आहे.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी एक अनोळखी तरुण आला. वॉचमन दीपक पवार यांच्याकडे त्यांच्या मालकाचा व सुपरवायझरचा फोन नंबर मागितला. त्यानंतर बोलण्यासाठी वॉचमन दीपककडून त्यांचाही मोबाईलसुद्धा घेतला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

याच दरम्यान फोन नंबर लिहिण्यासाठी पेन मागून मोबाईल घेऊन फरारी झाला. वॉचमन दीपक पवार यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक पल्लवी मोरे या तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonmobilethief