
Jalgaon Crime News : येथील गावातील सराफा दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ६७ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
(Thieves stole bullion shop and looted gold and silver jewelery worth 67 thousand jalgaon crime news)
याप्रकरणी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहुणबारे गावात कुंदन बाविस्कर यांचे कुलस्वामिनी नावाचे सराफी दुकान आहे. मंगळवारी (ता.७) सायंकाळी पावणेआठला ते दुकान बंद करून घरी गेले.
आज सकाळी सव्वासातला त्यांना एका दुकानदाराने फोन करून सांगितले, की दुकानाच्या डाव्या साईडचे शटर वाकलेले दिसत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बाविस्कर यांनी तत्काळ दुकानात धाव घेतली असता चोरट्यांनी शटरची लोखंडी पट्टी तोडून शटर वाकवून आत दुकानात प्रवेश करून ५५ हजार रूपये किंमतीचे ७०० ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे व १२ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या नाकातील फुल्या असा सुमारे ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले. ही चोरीची घटना मंगळवारी (ता. ८) सकाळी साडेसातला उघडकीस आली.
या प्रकरणी कुंदन बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार जालमसिंग पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.