KBCNMUच्या आवारात चोरट्यांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

KBCNMUच्या आवारात चोरट्यांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ (KBCNMU) परिसरातील कर्मचारी निवासस्थानात कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ३ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पाळधी आऊटपोस्टला चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, रवींद्र पांडुरंग गायकवाड (वय ५१) विद्यापीठात नोकरीला असून ११ मेपासून त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने शासकीय घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील ३ लाख ८९ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ९ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ९८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. रवींद्र गायकवाड यांनी पाळधी औटपोस्टला धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.

हेही वाचा: ऐकाव ते नवलच...! पठ्ठ्याला तब्बल 13 वेळा झालाय सर्पदंश

सुरक्षेत चुक?

विद्यापीठ परिसरात चारही बाजूने कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा चौकी आहे, तर उर्वरित चारही मार्गावर सुरक्षा रक्षक तैनात असतात अशा, परिस्थीतीत चोरटे थेट कर्मचारी निवासस्थानात चोरी करत असतील तर, इतर महत्त्वाची कार्यालये आणि परिसर असुरक्षित असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. खासगी सुरक्षारक्षकांच्या कामावरही यातून प्रश्न उपस्थित होत आहे

हेही वाचा: PWD वित्त अधिकाऱ्याचा मुलगा ‘चोर’...साथीदारासह अटक

Web Title: Thieves Stole Rs 4 Lakh From Kbcnmu Premises Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News
go to top