esakal | Jalgaon : हजारो हेक्टर क्षेत्र बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon : हजारो हेक्टर क्षेत्र बाधित

Jalgaon : हजारो हेक्टर क्षेत्र बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कजगाव : परिसरात सोमवारी व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिके नष्ट झाली असून, हजारो हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, मका, ज्वारी, तूर आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

कजगाव परिसरात सोमवारी (ता. २७) व मंगळवारी (ता.२८) झालेल्या अतिवृष्टीने उरलीसुरली शेतातील पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये तीन ते चार फूट पाणी तुंबले असून, हे पाणी ३५ तासांनंतरही तसेच असल्याने पिके सडतील, अशी स्थिती आहे. अनेक पिकांनी मान टाकल्या आहेत. शेतात तुंबलेले अथांग पाणी बांध फोडून बाहेर काढण्यासाठी शेतकरी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र सर्वदूर नजरेस पडत आहे. तुंबलेले पाणी लवकर निघाले, तर निदान झालेला खर्च तरी पदरात पडेल, याच आशेने सर्वत्र हेच चित्र नजरेस पडत आहे.

राजकीय नेत्यांची पाठ

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला असताना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी साधी पाहणीदेखील केली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदतीचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भोरटेक येथील शेतकरी नेते अशोक देशमुख यांनी केली आहे.

loading image
go to top