Jalgaon Crime News : औरंगाबादला पळवून नेत युवतीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : औरंगाबादला पळवून नेत युवतीवर अत्याचार

मेहुणबारे (जि. जळगाव) : युवतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कारमधून औरंगाबाद येथे पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तेथील सिडको बसस्थानकावर तिला सोडून देत तरुणाने पळ काढला. (Threatened to make photos viral young woman torture by youth jalgaon crime news)

या प्रकरणी गुरुवारी (ता. २६) संशयित किरण कोलते याच्यासह त्याचा मित्र व इतर अनोळखी दोन जण अशा चौघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीजवळील निधोरा गावातील संशयित किरण भाऊसाहेब कोलते याने २१ वर्षीय युवती दहावीत असताना तिचा मोबाईलमध्ये फोटो काढला होता.

त्यानंतर त्याने शाळेत येऊन तू जर मला भेटली नाही तर काढलेला फोटो फेसबुक, व्हॉटसअपवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली.

त्यानंतर १३ जानेवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास संशयित किरण हा त्याच्या तीन मित्रांसोबत तरुणी राहत असलेल्या परिसरात आला. या दरम्यान किरण याने तरुणीला बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत युवतीला मित्रांच्या मदतीने बळजबरीने कारने औरंगाबाद पळवून नेले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

या ठिकाणी संशयित किरण याने त्याच्या घरी सलग दोन दिवस युवतीवर अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला एकटीला औरंगाबाद शहरातील सिडको येथील बसस्थानकावर सोडून किरण निघून गेला.

भेदरलेल्या अवस्थेत तरुणी तिच्या गावी पोहचली व त्यानंतर तिने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी किरण कोलते याच्यासह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण तपास करत आहेत.