सहा बनावट पिस्तुलांसह तिघे ताब्यात

चोपड्यात ‘आयजीं’च्या पथकाची कारवाई; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
crime
crime sakal
Updated on

चोपडा : नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरुवारी (ता. २८) रात्री एकच्या सुमारास तालुक्यातील विविध ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा बनावट पिस्तुल, २४ जिवंत काडतुसे यासह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, एक जण पसार झाला आहे.

crime
फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन वेगवेगळ्या भागात छापा टाकून एकूण सहा स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्तूल व २४ जिवंत काडतूस बाळगणारे संशयित सतनामसिंग जुनैजा, अक्षय महाले, विजय पाटील यांना पोलिसांनी अटक केली असून, हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर हा फरार झाला आहे. या दोन्ही घटनेत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, अक्षय महाले, विजय पाटील, हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील तपास करीत आहेत. तर संशयित सतनामसिंग महारसिंग जुनैजा याच्यावर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे तपास करीत आहेत.

...अशी केली कारवाई

खाऱ्या पाडाव शिवारात उमर्टी वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (वय २२, रा. उमर्टी, जि. बडवाणी) याच्याकडून ८२ हजार ५०० रुपये किमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह चौदा जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले असून, जुनैजा यास अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेत पहाटे चारच्या सुमारास चोपडा - धरणगाव रस्त्यावरील हॉटेल विश्वसमोर ७५ हजार रुपये किमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्तूल व दहा जिवंत काडतूस बाळगणाऱ्या अक्षय महाले (वय २५, रा चोपडा), विजय पाटील (वय ३२, रा. चोपडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर (वय ३५) उमर्टी (जि. बडवाणी) हा फरार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com