Jalgaon News : आजाराला कंटाळून त्याने मृत्युला कवटाळले

Death News
Death Newsesakal
Updated on: 

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनीतील २१ वर्षीय तरुणाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्याम ऊर्फ प्रिरेश दिनेश पाटील (वय २१; रा. सुप्रिम कॉलनी, असे मृत तरुणाचे नाव आहे.

सुप्रिम कॉलनीत प्रिरेश ऊर्फ श्याम पाटील हा तरुण आई-वडील आणि दोन भावंडासह वास्तव्याला होता. खासगी कंपनीत तो कामावर होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पाठीचा त्रास सूरू होता. गेल्या आठवड्यात त्याच्या औषधोपचार करून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (Tired of disease he died twenty one year old man hanged himself Jalgaon Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Death News
Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

मात्र तरी, त्रास कमी न होता त्याला असहनीय वेदना सुरुच होत्या. सोमवार (ता. ९) रोजी सायंकाळी वडील बैठकीसाठी बाहेर गेले तर आई मंदिरात गेली होती. घरात कोणीही नसतांना प्रिरेश याने गळफास घेत आत्महत्या केली.

सायंकाळी प्रिरेशची आई वंदना पाटील ह्या घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीला आला. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फेाडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. तत्काळ त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. पोलिस नाईक विकास सातदिवे तपास करीत आहेत.

Death News
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tukaram Bagul
Nagar Taluka Murder News Man Dies After Iron Weapon Attack While Settling Husband Wife Dispute Brother In Law Absconds
Jalgaon Crime News
Jalgaon Mother and Son Case
Marathi News Esakal
www.esakal.com