esakal | Jalgaon: वीस किलोमीटरमध्ये दोनदा टोलवसुली
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: वीस किलोमीटरमध्ये दोनदा टोलवसुली

Jalgaon: वीस किलोमीटरमध्ये दोनदा टोलवसुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगावकडून वरणगाव, मुक्ताईनगरला जाताना मोठ्या वाहनधारकांना तब्बल दोन ठिकाणी टोल भरावे लागत आहेत. अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी टोल भरावा लागत असल्याने वाहनाधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, फेकरीचा टोल रद्द करावा अशी मागणी होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमांनुसार ६० किलोमिटरच्या अंतरात केवळ एकच टोलनाका असावा. मात्र नशिराबाद ते फेकरी या २० किमी अंतरात दोन ठिकाणी टोल वसुली होते. यामुळे वरणगाव, मुक्ताईनगर भागातून जळगावकडे जाणाऱ्यांना दुहेरी भुर्दंड बसतो.

राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५६ मधील चिखली ते तरसोद महामागाचे ६३ किलोमिटर अंतराचे चौपदरीकरण झाले. प्राधिकरणाच्या नियमांनुसार ६० किमी अंतरात दोन टोल निर्माण करता येत नाहीत. मात्र, महामार्गावरील फेकरी (ता.भुसावळ) गावाजवळ पूर्वीपासून एक टोल नाका आहे. आता दुसरा टोल नाका नशिराबादजवळ सुरु झाला आहे. वीस किलो अंतरात दोन टोल नाके असल्याने दुहेरी भुर्दंड बसतो. वरणगाव, मुक्ताईनगरकडून जळगाव येथे जाणाऱ्या वाहन धारकांना फेकरी टोल नाक्यावर १५ ते ३० रुपये आणि पुढे नशिराबाद टोलनाक्यावर १३० रुपये टोल द्यावा लागतो. नशिराबाद जवळील टोल नाका सुरू झाल्यावर फेकरी टोलनाका बंद होणे गरजेचे होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने तसे केलेले नाही.

मासिक पासधारकांची नाराजी

महामार्गाच्या २० किमी अंतरातील वाहनधारकांना मासिक २८५ रुपये टोल आहे. यासाठी फास्ट टॅग सक्तीचा आहे. मात्र, या सुविधेमध्ये महिन्यांची ३० दिवसांची मुदत ठेवण्याऐवजी कॅलेंडर महिन्याची अट आहे. म्हणजेच १५ तारखेला पास काढला तर तो केवळ त्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत वैध असतो. याबाबत नाराजी व्यक्त होताना दिसते.नशिराबाद टोलनाक्यावर कार, प्रवासी व्हॅन, जीप व इतर मोटर वाहनांसाठी ८५ रुपये, दुहेरी प्रवासासाठी १३० रुपये टोल द्यावा लागतो.

रेल्वे उड्डाणपुलांची कामे अपूर्ण

महामार्गाच्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणची रेल्वे उड्डाण पुलांची कामे अपूर्ण आहे. साईड रोडचीही कामे अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले. मात्र ज्याठिकाणी रस्ता अरूंद होतो त्याठिकाणी दिशादर्शक, सूचना दर्शक फलक लावलेले नाही. यामुळे वाहनांना दररोज अपघात होतात. काल मध्यरात्रीनंतर भुसावळला रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडेच ट्रॅव्हल व मॅटडोरमध्ये अरूंद होणाऱ्या रस्त्यांवर समोरासमोर धडक होवून मोठा अपघात झाला आहे.

फेकरी (ता. भुसावळ) रेल्वे उड्डाण पुलावरून वापरण्यासाठी फेकरी (ता. भुसावळ) येथे पूर्वीचा टोल नाका आहे. या टोल नाक्याची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. नियमानुसारच वाहनचालकांकडून टोल वसुली केली जाते.

-सी. एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

loading image
go to top