
चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह ट्रॅक्टर ताब्यात
जळगाव : डिकसई शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झालाय.
जळगाव तालुक्यातील डिकसाई शिवारात असलेल्या तापी नदीपात्रातून काही जण वाळूची चोरी करत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यानुसार कारवाईच्या सूचना दिल्यात. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २५) दुपारी १२ वाजता डिकसाई शिवारातील तापी नदीपात्रात गेले असता वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ३९८६) आढळून आले. ट्रॅक्टरचालक मुकूंदा साळुंखे (रा. कोळन्हावी, ता. यावल) याला वाळू वाहतुकीचा परवानाची विचारपूस केली असता ट्रॅक्टरचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय दुसाने हे करीत आहे.
हेही वाचा: ‘म्हाडा’ पेपरफूट प्रकरणाचे जळगावात ‘खोदकाम’
हेही वाचा: स्पर्धा परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने घेतला गळफास
Web Title: Tractor Thieves Arrested Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..