Latest Jalgaon News | निर्दयीपणे जनावारांची वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime : निर्दयीपणे जनावारांची वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : वाहनात निदर्यीपणे जनावरे कोंबून ते कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिरसोली गावाजवळ पकडले. याप्रकरणी रईस खान ऊर्फ डल्या (रा. तांबापुरा) व उमेश भाऊलाल जाधव या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Trafficking of animals in cruel manner case been registered against both crime Latest Jalgaon News)

हेही वाचा: Indian Railway: मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकला थांबली

शहरातील विद्युत कॉलनीतील राजेंद्र रामदास गांगुर्डे रविवारी (ता. २०) सकाळी साडेसहाच्या सुमारास वरखेडी (ता. पाचोरा) येथे जाण्यासाठी निघाले. शिरसोली गावाच्या पुढे वाहन (एमएच १९, सीवाय ६५२०) मधून अत्यंत निदर्यीपणे जनावरांची वाहतूक केली जात होती. गांगुर्डे यांनी वाहनाला थांबवून त्याच्याकडे जनावरांबाबत विचारपूस केली. मात्र, वाहनचालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

ही जनावरे पाथरी गावातून रईस खान ऊर्फ डल्या याने वाहनात भरून घेऊन जाण्यास सांगितल्याचे चालकाने सांगितले. या वेळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी हे वाहन पकडल्यानंतर गुरांची गो-शाळेत सोडून देण्यात आले. याप्रकरणी रईस खान ऊर्फ डल्या व उमेश भाऊलाल जाधव या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Nashik : Smart Roadचा फेरीवाले, रिक्षा चालकांनी घेतला ताबा