Jalgaon News : पोलिओ डोसनंतर चिमुकलीच्या मृत्यूचा आरोप; आजोबांनी मृतदेह मांडीवर ठेवून शवविच्छेदनगृहाबाहेर काढली रात्र, मृतदेह घेण्यास डॉक्टरांचा नकार

जळगाव - जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना आली समोर.
Sachita Borse marathe

Sachita Borse marathe

sakal

Updated on

जळगाव - जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील जवानाची अडीच वर्षीय बालिका पोलिओ डोस घेतल्यानंतर दगावली. शवविच्छेदनासाठी जिल्‍हा रुग्णालयात आणले. मात्र, येथील डॉक्टरांनी रात्री मृतदेह घेण्यास नकार दिल्याने वयोवृद्ध आजोबा आपल्या नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदनगृहाबाहेर बसून असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com