विशेष उत्सव रेल्वे गाड्यांचा विस्तार; धावणार 20 गाड्या

चेतन चौधरी 
Monday, 28 December 2020

रेल्वेने 20 विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, प्रवाशांना यामुळे सुविधा होणार आहे.

भुसावळ : रेल्वेत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेने 20 विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, प्रवाशांना यामुळे सुविधा होणार आहे.

आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं डावपेच, ते कोणते ? वाचा सविस्तर

नव्याने सुरू करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 01115 डाऊन पुणे-गोरखपूर (प्रत्येक गुरुवार) 7 ते 28 जानेवारी पर्यंत 4 फेरि करण्यात येईल. गाडी क्रमांक 01116 अप गोरखपूर-पुणे (प्रत्येक शनिवार) 9 ते 30 जानेवारी पर्यंत 4 फेरि होईल. गाडी क्रमांक 02135 डाऊन पुणे- मंडुआडीह ही गाडी 4 ते 25 जानेवारी पर्यंत दर सोमवारी धावेल. गाडी क्रमांक 02136 अप मंडुआडीह-पुणे ही 8 ते 27 जानेवारी पर्यंत दर बुधवारी धावेल. गाडी क्रमांक 01407 डाऊन पुणे-लखनऊ ही 5 ते 26 जानेवारी पर्यंत मंगळवारी धावेल. गाडी क्रमांक 01408 अप लखनऊ-पुणे (गुरुवार) 7 ते 28 जानेवारी पर्यंत धावेल.

आवर्जून वाचा-  ..तर खडसेंच्या निर्देशानुसार निर्णय 

गाडी क्रमांक 01033 डाऊन पुणे-दरभंगा (बुधवार) पासून 6 ते 27 जानेवारी पर्यंत सुरु राहील. गाडी क्रमांक 01034 अप दरभंगा-पुणे (शुक्रवार) 4 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01079 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर (गुरुवार) पासून 7 ते 28 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 01080 अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस (शनिवार) 9 ते 30 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 02031 डाऊन पुणे-गोरखपूर (मंगळवार, शनिवार) 2 ते 30 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 02032 अप गोरखपूर-पुणे (गुरुवार, सोमवार) 4 जानेवारी ते 1फेब्रुवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 02101 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस -हावडा (शुक्रवार, मंगळवार) 1 ते 29 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 02102 अप हावडा- लोकमान्य टिळक टर्मिनस (रविवार, गुरुवार) 3 ते 31 जानेवारी पर्यंत धावेल. गाडी क्रमांक 06502 अप यशवंतपूर -अहमदाबाद (रविवार) 27 डिसेंबर- ते 31 जानेवारी पर्यंत धावेल.

वाचा- जिल्ह्यात ‘सिरो’चा तिसरा सर्व्हे; ५११ जणांचे घेतले नमूने

गाडी क्रमांक 06501 डाऊन अहमदाबाद यशवंतपूर (मंगळवर) 29 डिसेंम्बर ते 2 फेब्रुवारी पर्यंतसुरु राहील. गाड़ी क्रमांक 02131 डाउन पुणे जबलपुर (मंगळवार) 5 जानेवारी ते 30 मार्च पर्यंत धावेल. गाड़ी क्रमांक 02132 अप जबलपुर पुणे (सोमवार) 4 जानेवारी ते 29 मार्च पर्यंत धावेल. गाड़ी क्रमांक 04151 अप कानपूर लोकमान्य तिलक टर्मिनस (शुक्रवार) 8 ते 29 जानेवारी पर्यंत धावेल. गाड़ी क्रमांक 04152 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कानपूर (शनिवार) 9 ते 30 जानेवारी पर्यंत धावेल.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: train marathi news bhusawal special festival trains run