सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक जलदगतीने

सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक जलदगतीने

भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने डॉ.आंबेडकर नगर ते यशवंतपुर दरम्यान आणि सुरत ते अमरावती दरम्यान द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी प्रवाश्यांच्या सोयीसाठी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तर एलटीटी ते कानपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार करण्यात येणार आहे.

यात डॉ.आंबेडकर नगर-यशवंतपुर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक 09301 डाउन 28 फेब्रुवारी 2021 पासून दर रविवारी डॉ.आंबेडकर नगरहुन 20.00 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी यशवंतपुर येथे 11 वाजता पोहोचेल. प्रवाशादरम्यान ही गाडी चांदूर बाजार 9.08 वाजता, नवी अमरावती 9.48 वाजता, अकोला 11.40वाजता या स्थानकांवर थांबेल. तर गाडी क्रमांक 09302 अप विशेष गाडी 2 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी यशवंतपुरहुन 15.40 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी डॉ.आंबेडकर नगर येथे 07.15 वाजता पोहोचेल. प्रवासात ही गाडी अकोला 15.00 वाजता, नवी अमरावती 16.37 वाजता, चांदुर बाजार 17.33 वाजता या स्थानकांवर थांबेल.


सूरत-अमरावती दरम्यान द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी क्रमांक 09125 डाऊन दिनांक 26 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवार व रविवार रोजी सुरतहुन 12.20 वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी अमरावती येथे 22.25 वाजता पोहोचेल. प्रवाशादरम्यान ही गाडी जळगाव 17.40 वाजता, भुसावळ 18.10 वाजता, मलकापूर 19.04 वाजता, नांदुरा 19.24 वाजता, शेगाव 19.43 वाजता, अकोला 20.20 वाजता, मुर्तीजापुर 20.49 वाजता, बडनेरा 21.45 वाजता या स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक 09126 अप अमरावती सुरत विशेष गाडी दिनांक 27 फेब्रुवारी 2021 पासून दर शनिवार व सोमवार रोजी अमरावतीहुन 09.05 वाजता रवाना होईल आणि त्याच दिवशी सुरत येथे 19.05 वाजता पोहोचेल. प्रवासादरम्यान ही गाडी बडनेरा 09.20 वाजता, मुर्तीजापुर 09.53 वाजता, अकोला 10.30 वाजता, शेगाव 11.02 वाजता, नांदुरा 11.23 वाजता, मलकापूर 11.53 वाजता, भुसावळ 13.10 वाजता, जळगाव 13.42 वाजता या स्थानकांवर थांबणार आहे. या गाड्यांना 1 वातानुकूलित चेअर कार, 14 द्वितीय श्रेणी डबे असतील. 09126 या पूर्णपणे आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांचे सामान्य शुल्कासह बुकिंग 23 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करता येईल. 
 

सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार
रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी एलटीटी ते कानपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. 04152 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष एलटीटी येथून 6 मार्च ते 1 मे दरम्यान दर शनिवारी 4.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी कानपूर सेंट्रल येथे दुपारी 3.25 वाजता पोहोचेल. 04151 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष कानपूर सेंट्रल येथून 5 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान दर शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता सुटेल दुसर्‍या दिवशी दुपारी 3.55 वाजता एलटीटी पोहोचेल. ही गाडी भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज आणि फतेहपूर स्थानकांवर थांबेल या गाडीला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सात वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 8 शयनयान आणि 7 द्वितीय श्रेणी आसन असतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवाशांना कोविड -19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com