Tribal Women
sakal
चोपडा - तालुक्यातील विशेषतः आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सातपुडा पर्वतरांगांमधील अतिशय दुर्गम भागातील देवगड गावातील नीता बारेला या गरोदर मातेला प्रसूतीदरम्यान वेळेवर आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेची सेवा न मिळाल्याने अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णावाहिका उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आजही विशेषतः आदिवासी महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात दिसून येत आहे.