ट्रक-मोटारसायकल अपघातात रामीचे सरपंच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

truck motorcycle accident case

ट्रक-मोटारसायकल अपघातात रामीचे सरपंच ठार

निमगूळ : रामी (ता. शिंदखेडा) येथील सरपंच कडूजी रेवजी ठाकरे (वय ७२) दुपारी दोंडाईचा येथून मोटारसायकल (क्रमांक : एम एच १८, बी यू ५३७५) ने बाजार करून आपल्या गावी रामी येथे नंदुरबार रस्त्याने जात असताना रामी महादेव मंदिरासमोर मागून येणाऱ्या ट्रक (क्रमांक : एम एच १८ बी जी ६५५४) ने जोरदार धडक दिली.

त्यात त्यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला. ट्रक चालकाने सरपंच यांना चिरडून पळ काढला. नागरिकांनी धावडे गावाच्या पुढे नयन हॉटेल जवळ ट्रकला अडविले. ट्रक चालक फरार झाला. दोंडाईचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला. पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Truck Motorcycle Accident Case Rami Nimgul Sarpanch Kill Dhule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..