Truck Accident
sakal
जळगाव - शहरातील रहिवासी तथा ट्रकचालक व सहचालक सवाई माधोपूर येथे अपघातात ठार झाले. ही घटना सोमवारी (ता. १५) पहाटे घडली. धावता ट्रक पुलावरून खाली कोसळला. त्यात चालक जागीच ठार झाला, तर सहचालकाचा उपचार सुरू असताना बुधवारी (ता. १७) मृत्यू झाला. मृत दोघे तरुण जळगाव शहरातील आहेत.