Jalgaon News : प्रस्तावित न्यायालयाच्या जागेवर सट्ट्याचा अड्डा दिमाखात

Speculation
Speculationesakal

जळगाव : स्वातंत्र्य सेनानी मीर शुक्रूल्ला उद्यानाच्या जागेवरील अतिक्रमण जिल्हा न्यायालयास हस्तांतरित करण्यासाठी महापालिकेने हटविले. या जागेवरील स्वांतत्र्य सेनानींचा नामोल्लेख असलेला फलक व शिलालेखही जमीनदोस्त केला. या प्रस्तावित न्यायालयाच्या जागेवर सट्ट्याचा धंदा दिमाखात सुरू आहे. अड्डा चालविणाऱ्याने थेट पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील शाहूनगर संमिश्र लोकवस्ती आणि १९९२ च्या जातीय दंगलीनंतर संवेदनशील म्हणून शासनदप्तरी नोंदणीकृत आहे. जिल्‍हा पेठ आणि शहर, अशा दोन पोलिस ठाण्यांची हद्द शाहूनगरच्या मधोमध जाते. येथेच तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य सेनानी मीर शुक्रूल्ला यांच्या नावे ट्रॅफीक गार्डन उभारले होते.(Speculation on proposed court site Shocking Driver claims that haunt is running permission of police Jalgaon Crime News)

Speculation
Cyber Crime News : अश्लिल Vedio Callच्या बळावर उकळली खंडणी

उद्यानाच्या तिन्ही बाजूने पोलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असून, मधोमध साडेचार एकरांत उद्यानाची जागा ओसाड पडली आहे. ही जागा जिल्हा न्यायालयासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, गेल्याच महिन्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील अस्थायी अतिक्रमणासह स्वातंत्र्य सेनानी मीरशुक्रूल्ला यांचा नामफलक व भिंती, वॉचमन हाउस आणि उद्यानाची कोनशीला प्रस्तावित न्यायालयासाठी जमीनदोस्त केली. मात्र, न्यायालयाचे बांधकाम सुरू झालेच नाही. मात्र, या ठिकाणी एका सट्टापेढीचे दिमाखात ‘उद्‌घाटन’ झाले आहे.

पोलिस परवानगी अन्‌ व्हायरल व्हिडिओ

पोलिसांची निवासस्थाने आणि मैदानात सट्ट्याचा अड्डा सुरू करण्याचे धाडस राजकीय वरदहस्त आणि पोलिस परवानगीशिवाय अशक्य आहे अन्‌ घडलेही तेच. अड्डाचालकाने मांडलेला धंदा थेट जिल्‍हापेठ पोलिस ठाणे आणि ‘एलसीबी’च्या परवानगीनेच मांडल्याची बतावणी करीत असून, या सट्ट्याच्या अड्ड्याचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ता असलेल्या शांतता कमिटी सदस्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास पाठविला आहे. सर्रास सट्ट्याच ओपन-क्लोज होत असल्याचा व्हिडिओ शहरातील विविध ग्रुपवरही व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Speculation
Jalgaon Crime News : उड्डाणपुलावर रोकडसह दोन मोबाईल हिसकावले

अवैध धंदेवालेच पोलिस मित्र

जळगाव शहरातील आणि शाहूनगर परिसरातील अवैध धंदेवाईक सर्वच्या सर्व पोलिस मित्रच असून, मोठमोठ्या गंभीर गुन्ह्यांत मांडवालीसाठी ही मंडळी कार्यरत असते. गुन्हे शोध पथकाचे जेम्स बॉन्ड पोलिस या गुन्हेगारांना वाहनांवर घेऊन सर्रास रपेट मारताना दिसत असल्याने जनसमान्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे गुन्हेगार पोलिसांचा योग्य पद्धतीने वापरही करून घेतात.

चिंथा जाताच मिटली चिंता

सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाल्याच्या आनंदात त्यांना शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या निरोप समारंभाचे आयेाजन केले होते. वास्तविक चिंथा यांची बदली होणे म्हणजेच अवैध धंद्यावाल्यांसह कलेक्शनवाल्या पोलिसांची चिंता मिटल्याचे द्योतक होते. साधारण दोनच महिन्यांत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, गुन्हे शाखेचे निरीक्षक, अशा अधिकाऱ्यांची फळीच बदलून गेल्याने अवैध धंदेवाल्याचे ‘अच्छे दिन’ आले आहेत.

परिसर वगळून पोलिस गस्त

जिल्‍हापेठ, शहर पोलिस ठाण्याची सामाईक हद्द असलेल्या शाहूनगरात परिचित पोलिस मित्रांचे अवैध धंदे चालविले जात असल्याने जिल्‍हापेठ असो की, शहर पोलिस ठाणे असो या परिसरात पोलिस पेट्रोलींगच होत नाही. लॉकडाउननंतर या परिसरात सायरन वाजवणारी पोलिस गाडीच लोकांनी पाहिली नसल्याचे एकाने सांगितले.

Speculation
Jalgaon News : तळमजला Parking नसलेल्या इमारतींना अभय; महापालिका कारवाई करण्यास असमर्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com