Latest Marathi News | जेवण करताना ताटात कोंबडीने उडी टाकली अन् भावांमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fight

जेवण करताना ताटात कोंबडीने उडी टाकली अन् भावांमध्ये जुंपली

यावल (जि. जळगाव) : जेवण करत असताना ताटात कोंबडीने उडी टाकली आणि भावाभावात भांडण झाले. या वेळी इतर दोघांनी गैरसमजातून एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: अल्पवयीन मुलीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते

तालुक्यातील टेंभी कुरण येथील गोविंदा राजेश सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घरात जेवण करत होते. जेवण सुरू असताना त्यांच्या भावाच्या कोंबडीने त्यांच्या ताटामध्ये उडी मारली. यामुळे संतापाच्या भरात गोविंदा सोनवणे यांनी यांच्या भावाशी वाद घातला. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणारे अरुण संतोष भांगरे व प्रवीण संतोष भांगरे या दोघांना वाटले की हा आम्हाला शिवीगाळ करतोय म्हणून या दोघांनी गोविंदा सोनवणे यांना लाकडी दांड्याने मारून दुखापत केली.तेव्हा गोविंदा सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात अरुण भांगरे व प्रवीण भांगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: काय तो चिखल!काय ते खड्डे, काय ती लाईट! सगळं कस ओके जुनी सांगवीतील पवारनगर रस्त्यावर लावलेला फलक सोशल मीडिया वर होतोय व्हायरल-

Web Title: Two Brothers Fight Over Chicken Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon