

Jalgaon Horror Two Class 9 Girls Die After Being Pushed Into Well
Esakal
Jalgaon Youth Admits Killing Two Minor Girls भुसावळ तालुक्यातील साक्री इथं नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या दोन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलून दिल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माथेफिरू तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दोन्ही मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होणार नाही आणि आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय.