जळगावात एकाच दिवसात दोन प्राणघातक हल्ले

जळगाव शहरातील गुन्हेगारी वाढत असून कुणाचाही जीव घेणे सहज शक्य झाले आहे.
crime news
crime newsesakal

जळगाव : शहरातील गुन्हेगारी वाढत असून कुणाचाही जीव घेणे सहज शक्य झाले आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील जरब कमी झाल्याने चालता बोलता प्राणघातक हल्ले होत आहे. रविवारी (ता. १५) शहरात काही तासांच्या अंतरावर एका पाठेापाठ दोन प्राणघातक हल्ले झाले असून आबा बाविस्कर टोळीने वर्चस्वासाठी रेल्वे मालधक्क्यावरील मुकादमावर चॉपरने हल्ला चढवला तर, सुप्रिम कॉलनीत दारुचे बिल देण्यावर एका तरुणाला चाकू खुपसण्यात आल्याची घटना घडली आहे. (Two deadly attacks in one day in Jalgaon)

जखमी मुकादम राजू बिसमिल्ला पटेल (वय ४७, रा. राजमालतीनगर, दुध फेडरेशन) जळगाव रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्यावर मुकादम म्हणून कामाला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी (ता. १४) जेवणासाठी घरी आले असताना राजू पटेल यांना एका हमालाचा फोन आला, की मालधक्क्यावर भांडण सुरू आहे. तुम्ही माल धक्क्यावर या. त्यानुसार पटेल हे लागलीच मालधक्क्यावर पोहचले, तेथे हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार राजू पटेल यांनी माथाडी मंडळाकडे केली होती. या तक्रारीच्या रागातून आबा बाविस्कर याच्या सांगण्यावरून छोटू बाविस्कर व इतर सात ते आठ गुंडांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात छोटू बाविस्कर याने चॉपरने पटेल यांच्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. घटना घडल्यानंतर राजू पटेल यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात आबा बाविस्कर, छोटू बाविस्कर आणि इतर ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; दोघांविरुद्ध गुन्हा

वर्चस्वाचा वाद

राजू पटेल अनेक वर्षांपासून मुकादम म्हणून रेल्वे मालधक्क्यावर कार्यरत आहे. मात्र, गेल्या देान- तीन वर्षांपासून या मालधक्यावर वेगवेगळ्या मुकादमांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. हमालांना किमान वेतन अदा करण्याऐवजी त्यांची सर्रास पिळवणूक केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी होतात. मात्र, त्यांच्यावर कुठलीच ठोस कारवाई होत नाही. त्यातूनच आता गँगवार सुरु झाला आहे.

दारूचे बिल भरण्यावरून तरूणावर चाकूहल्ला

शहरातील सुप्रिम कॉलनीतील अक्षय शांताराम दांडगे हा शनिवार (ता. १४) दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र प्रभाकर ऊर्फ भूषण चांदेलकर सोबत दारू पिण्यासाठी गेले. दोघांनी यथेच्छ दारू पिल्यानंतर प्रभाकरने अक्षयला दारूचे बिल भरण्यास सांगितले. त्यावर माझ्याकडे दारूचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे तो म्हणाला. याचा राग आल्याने प्रभाकर ऊर्फ भूषण चांदेलकर याने अक्षयला बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकूने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. त्यावेळी दारूच्या दुकानासमोर अक्षयचा काका गणेश दांडगे हा रिक्षा घेऊन प्रवाशांची वाट पाहत होता. हाणामारीचा आवाज येऊन काका गणेश याने पुतण्याला मारहाणीतून सोडवून जखमी अवस्थेत जिल्‍हा रुग्णालयात हलवल्याने त्याचा जीव वाचला. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दाखल गुन्ह्यात संशयिताची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या गुन्हेशोध पथकाने हल्लेखोर चांदेलकर याला दारूच्या अड्ड्यावरून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

crime news
चौथा पती गळ्यात माळ टाकणार तोच...चतुर्भुज विवाहितेचा सिनेस्टाईल प्रताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com