Jalgaon Crime News : उड्डाणपुलावर रोकडसह दोन मोबाईल हिसकावले

Crime news
Crime newsesakal

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाण रेल्वेपुलाजवळ रात्री अकराच्या सुमारास तीन भामट्यांनी तरुणाला बिडी मागण्याचा बहाणा करून थांबविले. बिडी देत नाही, म्हणून भांडण करून त्या तरुणाच्या खिशातील १७ हजारांची रोकड, दोन मोबाईल, असा ३० हजारांवर ऐवज लुटून नेला.

सचिन राजेंद्र अहिरे (वय ३७, रा. क्षत्रिय मंगल कार्यालयामागे, शिवाजीनगर) साफसफाईचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी (ता. २१) रात्री अकराच्या सुमारास सचिन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळून जात असताना, दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्याची वाट अडवली. (Two mobile phones along cash seized from flyover

Jalgaon Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Crime news
Jalgaon News : तळमजला Parking नसलेल्या इमारतींना अभय; महापालिका कारवाई करण्यास असमर्थ

सचिनला बिडी दे, असे म्हणत थांबविले. सचिनने बिडी दिली नाही, म्हणून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील १७ हजारांची रोकड व दोन मोबाईल लांबविले. या प्रकारानंतर सचिन अहिरे याने जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी (ता. २२) रात्री नऊला तीन जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश भंडारकर तपास करीत आहेत.

रात्री लुटीच्या घटना वाढल्या

शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा परिसर, रेल्वेस्थानक प्रमुख प्रवेशद्वार, गेंदालाल मिलकडील परिसर, शाहूनगर, सिंधी कॉलनी, तांबापुरा, मेहरूण, अशा ठिकाणी लुटारू तरुणांचे टोळके रात्री उशिरापर्यंत थांबून असतात. सावज हेरून त्याची लुबाडणूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येतात. मात्र, त्यात गुन्हे दाखल होत नाहीत. झालाच तर मोबाईल गहाळ, लोखंडी पट्टीने वार करून जखमी केल्याच्या किरकोळ तक्रारी करून प्रकरण दडपले जाते.

Crime news
State Transport Corporation : बनावट प्रमाणपत्रांमुळे वाहक त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com