Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार तयारी; शिवसैनिकांचा उत्साह शिगेला!

uddhav thackeray
uddhav thackeray esakal

Jalgaon News : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रविवारी (ता. २३) पाचोरा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या जाहीर सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमधील आनंद व उत्साह शिगेला पोहोचला आहे. (Uddhav Thackeray is coming to Pachora on 23 april jalgaon news)

या तयारीची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असून, सभेला दीड लाखांची उपस्थिती राहील, असा अंदाज घेऊन सभेची तयारी करण्यात येत आहे. रविवारी (ता. २३) दुपारी दोनपर्यंत उद्धव ठाकरे यांचे पाचोऱ्यात आगमन होणार आहे. जळगाव विमानतळावरून ते कारने पाचोरा येणार असून, त्यांचे शहराच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

भडगाव रोड भागातील निर्मल सीड्सच्या विश्रामगृहात शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर निर्मल सीड्सने उभारलेल्या अत्याधुनिक मायकोरायझा लॅबचे उद्घाटन व या लॅबच्या प्रांगणातील माजी आमदार तथा निर्मल सीड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर ओ. (तात्या) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच अंतुर्ली शिवारातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या आवारातील आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी पाच ते सहा दरम्यान निर्मल सीड्सच्या विश्रामगृहात विश्रांती घेऊन सायंकाळी सहाला ते जाहीर सभास्थळी येणार आहेत. भडगाव रोड भागातील सावा मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

uddhav thackeray
Jalgaon News : सर्वाधिक उंचीच्या कुळकर्णी परिवाराची 'या' तारखेला मुलाखत

याप्रसंगी मुंबई येथील शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनंत गीते , खासदार अरविंद सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्यासह मुंबईतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभेनंतर ते परत जळगावकडे रवाना होणार आहेत.

सुमारे १० एकर क्षेत्र असलेल्या सावा मैदानावर भव्य स्टेज उभारून आरामदायी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा भागातील सुमारे दीड लाख शिवसैनिकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे. खेड व मालेगावच्या जाहीर सभांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक उपस्थितीचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जाहीर सभास्थळी करण्यात आली आहे. आर. ओ. तात्या पाटील यांचे सर्वच क्षेत्रातील लोकांशी स्नेह व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न चालवले आहेत.

त्यांनी गुरुवारी (ता. २०) जाहीर सभा स्थळास भेट देऊन पाहणी केली. संबंधितांना उपयुक्त टिप्सही दिल्या. या वेळी रमेश बाफना, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, संदीप जैन, अनिल सावंत, ॲड. दीपक पाटील, कैलास मिस्तरी, संजय चौधरी, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन आदि पदाधिकारी उपस्थित होते.

uddhav thackeray
Jalgaon News : उद्धव ठाकरे या तारखेला जळगाव दौऱ्यावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com