Jalgaon KBCNMU News : विधी अभ्यासक्रमांच्या 2 विषयांची फेरतपासणी; ‘उमवि’ने दिली मुदतवाढ

KBCNMU
KBCNMUesakal

Jalgaon KBCNMU News : एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दोन विषयाच्या फेरतपासणीसाठी (रिड्रेसल) २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय ‘उमवि’ने घेतला आहे. (UMVI extended deadline for re examination of 2 subjects of law courses jalgaon news)

गेल्या काही दिवसांपासून विधी अभ्यासक्रमाच्या (एल.एल.बी द्वितीय सत्र व एल.एल.एम) निकालात त्रुटी असून, पुन्हा तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे केली होती. २८ मार्चला विद्यापीठात जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील सहा विधी महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक प्रतिनिधींसमवेत कुलगुरूंनी बैठक घेतली होती.

तीत निकालाबाबत चर्चा झाली होती. बैठकीतील निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन व्हावे, यासाठी एल.एल.बीच्या सहा आणि एल.एल.एमच्या दोन विषयांच्या उत्तरपत्रिकांचे यादृच्छिकपणे (रॅंडमली) मूल्याकंन तज्ज्ञ प्राध्यापकांकडून करण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झालेला आढळून आला नाही. विद्यापीठ नियमानुसार उत्तरपत्रिकेत एकूण गुणांमध्ये दहा टक्के बदल झाला, तरच तो ग्राह्य धरला जातो.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

KBCNMU
Gold Rate Hike : सोन्याला ‘सोन्या’चे दिवस..! दशकात तब्बल 40 हजार रुपयांची दरवाढ..

या तपासणीत फारसा बदल झालेला आढळून आला नसला, तरी विद्यार्थ्यांचे शंकाचे निरसन व्हावे व विद्यार्थ्यांपर्यंत वस्तुस्थिती समजावी, यासाठी सोमवारी (ता. १७) कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी व अधिकार मंडळाच्या काही सदस्यांची बैठक झाली.

तीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक दीपक दलाल यांनी सविस्तर माहिती दिली. त्यातील चर्चेत विद्यापीठाच्या अध्यादेशाप्रमाणे दोन विषयांसाठी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका रिड्रेसलला टाकण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ एप्रिलपर्यंत रिड्रेसलची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, प्राचार्य विजय बहीरम, प्राचार्य नितेश चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल पाटील, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, ॲड. केतन ढाके, केदारनाथ कवडीवाले, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

KBCNMU
Jalgaon KBCNMU News : उमवित उभारणार कवयित्री बहिणाबाई चौधरींचा पुतळा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com