Jalgaon News : गोलाणी मार्केट घाणीचे माहेरघर...! महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे हेतुपुरस्सर दुर्लक्ष

 uncleanliness in the Golani complex
uncleanliness in the Golani complex esakal

Jalgaon News : गोलाणी व्यापारी संकुलात खरेदीसाठी येताय, थांबा, घरून येतानाच नाकाला रूमाल लावून या. कारण या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर तुम्हाला दुर्गंधीचा सामाना करावा लागणार आहे. (uncleanliness in Golani complex jalgaon news)

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या यादीच्या स्वच्छतेत गोलाणी संकुलाचे नाव नसल्याचे दिसत आहे. मात्र, गाळेधारकांकडील वसुलीच्या यादीत मात्र या संकुलाचे नाव आहे. गाळेधारकांकडून पैसे हवेत. मात्र, त्यांना स्वच्छता देण्याबाबत मात्र आयुक्तासह अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

गोलाणी (वल्लभदास वालजी ) मार्केट शहरातील मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुल. महापालिकेच्या सतरा मजली इमारतीचे साथीदार आहे. अगदी हाकेच्या अंतरावर महापालिकेचा आरोग्य विभाग आहे.

संकुलात सर्वच ठिकाणी अस्वच्छता

व्यापारी संकुल मोठे विस्तीर्ण आहे. या ठिकाणी मोबाईलची अधिक दुकाने आहेत, तर वरच्या मजल्यावर कार्यालये आहेत. टेलरिंगची दुकाने आहेत. अगदी वरच्या मजल्यावर रहिवासी गाळे अर्थात फ्लॅटस आहेत आणि तळमजल्यावर भाजी, फळे आणि फुलांचा बाजारही आहे. मात्र, या संकुलाच्या कोणत्याही मजल्यावर स्वच्छता होत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 uncleanliness in the Golani complex
Jalgaon News : मणिपूरमध्ये अडकलेले जळगावचे 3 विद्यार्थी सुखरूप; आज तिन्ही मुले येणार

त्यामुळे सर्वच ठिकणी दुर्गंधी पसरली आहे. अगदी प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग साचले दिसतात. कुत्र्यांनी केलेली घाण, तसेच पडलेले शिळे अन्नाची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी खरेदीस येणाऱ्या ग्राहकास नाकाला रूमाल लावून येण्याशिवाय गत्यंतंर नाही.

तक्रार करायची कुणाकडे?

स्वच्छतेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यास ते लक्ष देत नाहीत. महापालिकेच्या व्यापारी संकुलाची स्वच्छतेची जबाबदारी आमच्याकडे नाही, असे उत्तर थेट अधिकारी देतात. त्यामुळे जबाबदारी कुणाची, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

दुसरीकडे याच संकुलातून महापालिका गाळेभाडे मात्र वसूल करीत आहे. एकीकडे गाळेभाडे घ्यायचे, दुसरीकडे स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही, हा महालिकेचा कोणता नियम आहे? या प्रश्‍नाचे उत्तरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.

...तर शहरात रोगराई पसरणार

गोलाणी संकुलात तातडीने स्वच्छता होण्याची गरज आहे. या ठिकाणी सर्व मजल्यांवर अस्वच्छता आहे. या संकुलातील मोकळ्या खोल्या अगदी कचऱ्याने फुल्ल भरल्या आहेत. त्याची दुर्गंधी आता सुटू लागली आहे.

 uncleanliness in the Golani complex
Summer Business : उन्हाळ्यात एसी, कूलरचा व्यवसाय थंड! यंदा केवळ 30 टक्‍के विक्री

तातडीने स्वच्छता केली नाही, तर गोलाणी संकुलातून रोगराई सुरू होऊन त्याची लागण शहरात होण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील, असे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

निंबाळकरांचा आदर्श आयुक्त घेतील?

गोलाणी संकुलात अशीच घाण पसरली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी गोलाणी संकुलात स्वत: फेरफटका मारला होता. नंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्व सफाई कामगार गोलाणी संकुलात लावून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली होती.

त्यावेळी तब्बल ७० ते ८० टन कचरा या संकुलातून काढण्यात आला होता. त्यानंतर संकुलाची साफसफाई कायम करण्यात येत होती. मात्र, आता पुन्हा ती बंद करण्यात आल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड तत्कालीन जिल्हाधिकारी निंबाळकर यांचा आदर्श घेऊन गोलाणी संकुलात स्वच्छता मोहीम राबवितील काय, असा प्रश्‍न व्यापारी व जनता उपस्थित करीत आहे.

 uncleanliness in the Golani complex
Jalgaon News: उच्चशिक्षितांकडून अक्षदा, मंगलाष्टकांना फाटा! प्रतिमापूजन, जिजाऊ वंदनेने बांधली लग्नगाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com