Jalgaon : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 101 उद्योजकांना मंजुरी

Jalgaon
Guardian Minister Gulabrao Patil and others while distributing approval orders to entrepreneurs under the Pradhan Mantri Micro Food Processing Udyog Yojana
Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil and others while distributing approval orders to entrepreneurs under the Pradhan Mantri Micro Food Processing Udyog Yojanaesakal

जळगाव : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेंतर्गत १०१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. पात्र लाभार्थ्यांना कर्जमंजुरी आदेशाचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १८) झाले.

येथील अजिंठा विश्रामगृहात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबत आढावा बैठक झाली. आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी उपस्थित होते. (Under Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme Allotment of approval orders to 101 entrepreneurs Jalgaon News)

Jalgaon
Guardian Minister Gulabrao Patil and others while distributing approval orders to entrepreneurs under the Pradhan Mantri Micro Food Processing Udyog Yojana
Jalgaon : हुडकोतील घरकुलांचे आता नावावर हस्तांतरण

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण १०१ प्रकरणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.

रूपाली चंद्रकांत पाटील, संजय दत्तात्रय पाटील, गोपाल सपकाळे, निकिता अमोल पाटील, जयश्री दत्तात्रय धनगर, बबिता राजेंद्र जैन, अश्विन पुंडलिक पाटील यांना कर्ज वितरणाचे आदेश पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. उपसंचालक भोकरे यांनी सूत्रसंचालन केले.

Jalgaon
Guardian Minister Gulabrao Patil and others while distributing approval orders to entrepreneurs under the Pradhan Mantri Micro Food Processing Udyog Yojana
Bharat Jodo Yatra : इंदिरा, राजीव आणि राहुल गांधींसोबत सुद्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com