Jalgaon : हुडकोतील घरकुलांचे आता नावावर हस्तांतरण

Gharkul News
Gharkul Newsesakal

जळगाव : महापालिकेने बांधलेली घरकुले अनेकांनी हस्तांतरित केली आहेत. मात्र, ती त्यांच्या नावावर झालेली नाहीत. त्यामुळे त्यांना नवीन नळकनेक्शन देण्यासाठीही अडचण निर्माण होत आहे. मात्र, आता घरकुलांचे रेडीरेकनरनुसार रक्कम भरून ते नावावर हस्तांतरित करण्यात येणार आहे, तसेच घरकुलांची थकबाकी असल्यास ती भरून नळकनेक्शनही देण्यात येणार आहेत. महापौरांच्या उपस्थित सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सभागृहनेते नितीन लढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेत सतराव्या मजल्यावर महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १८) सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. उपमहापौर कुलभूषण पाटील, सभागृहनेते नितीन लढ्ढा, विरोध पक्षनेते सुनील महाजन, कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, अनंत जोशी, नितीन बरडे, ॲड. शूचिता हाडा, ॲड. दिलीप पोकळे आदी उपस्थित होते.(Hudko Gharkul under transfer to name now Decisions mayor meeting water connection to flat tenant too Jalgaon News)

Gharkul News
Jalgaon : बस अभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट; बस सुरु करण्याची मागणी

याबाबत माहिती देताना नितीन लढ्ढा यांनी सांगितले, की महापालिकेने बांधलेल्या हुडको घरकुलातील घरकुलधारकांनी आपली घरे हस्तांतरित केली आहेत. मात्र ती त्यांच्या नावावर नाहीत, तसेच काही घरकुलधारकांनी आपली मागील थकबाकी भरलेली नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. त्यामुळे त्यांना अमृत योजनेंतर्गत नवीन नळकनेक्शन घेण्यास अडचण येत आहेत.

थकबाकी दोन हप्त्यात

घरकुलधारकांना आता दोन टप्प्यांत थकबाकी भरण्याबाबत मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात रक्कम भरल्यानंतर त्या रकमेची पावती दाखविल्यास त्यांना नवीन नळकनेक्शन देण्यात येईल. घरकुलधारकाने दुसऱ्याकडून घरकुल घेतले आहे, पण त्याचे अधिकृत हस्तातंरण झालेले नाही. त्यामुळे घरकुलधारक चितिंत आहेत. त्यांचा हा प्रश्‍न सोडविला आहे. घरकुलधारकांच्या नावावर आता घरकुल हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरकुलाचे आता रेडीरेकनर दराने किंमत काढून तेवढी रक्कम घरकुलधारकाने भरल्यास, तसेच त्यांनी शहरात कुठेही नावावर घर नसल्याचे हमीपत्र दिल्यास त्यांच्या नावावर घरकुल हस्तांतरित करण्यात येणार आहे. याबाबत एकमताने हा निर्णय घेतला आहे.

फ्लॅट भाडेकरूंनाही नळकनेक्शन

फ्लॅटमधील भाडेकरूंना नळकनेक्शन मिळण्यास अडचण येत होती. त्याबाबत आता निर्णय घेतल्याची माहिती देत श्री. लढ्ढा म्हणाले, की आता भाडेकरूंनाही नळकनेक्शन देण्यास मंजुरी दिली आहे.

Gharkul News
Jalgaon : शिपाई आत्महत्याप्रकरणी 10 जणांचे जामीन नामंजूर

सागर पार्कवरील स्पर्धाचे दर कमी

सागर पार्कवर क्रीडा स्पर्धांसाठी वाढीव दर आकारणी कमी करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धासाठी प्रतिदिन ३० हजार रुपये आकारणी करण्यात येत होती, ती आता कमी करून प्रतिदिन पाच हजार रुपये केली आहे. अनामत रक्कमही ५० हजार रुपये करण्यात आल्याची माहिती श्री. लढ्ढा यांनी दिली.

आमच्या काळात चांगली कामे : लढ्ढा

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. त्यांच्या काळात शहराचा विकास झाला नाही, असा आरोप केला होता. यावर उत्तर देताना नितीन लढ्ढा म्हणाले, की भारतीय जनता पक्षाची महापालिकेवर अडीच वर्षे सत्ता होती. त्यांच्या काळात कोणताही विकास झाला नाही. त्याच्यापेक्षा आमच्या कार्यकाळात चांगली कामे झाली आहेत. आज शहरातील सर्व भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय इतर विकासकामेही सुरू आहेत. त्यामुळे आमदार भोळे यांनी आमच्यावर चुकीचे आरोप करू नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Gharkul News
Jalgaon : बस अभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पायपीट; बस सुरु करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com