Jalgaon News : केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीयांनी केले जळगाव महापालिकेचे कौतुक

Union Minister Mansukh Mandaviya's tweet about the food basket scheme for tuberculosis patients by the Municipal Corporation.
Union Minister Mansukh Mandaviya's tweet about the food basket scheme for tuberculosis patients by the Municipal Corporation.esakal

Jalgaon News : महापालिकेतर्फे क्षयरोग रुग्णांना वाटप करण्यात आलेल्या फूड बास्केटच्या कार्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून कौतुक केले. जळगाव महापालिकेने रुग्णांना महिन्याभरासाठी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते फूड बास्केटचे वाटप केले होते.( Union Health Minister Mandaviya praised Jalgaon Municipal Corporation jalgaon news )

महापालिकेच्या या उपक्रमाची राज्य सरकारने दखल घेतली होती. या कामाचे कौतुक केले होते. तसेच केंद्र शासनाने आता या कामाची दखल घेतली आहे.

श्री. मांडवीय यांनी आपल्या हँडलवर महापालिका आयुक्तांनी वाटप केलेल्या फूड बास्केटचे छायाचित्र ‘शेअर' केले आहे. श्री. मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब साथ हो नि-क्षय मित्रो का प्यार, टी. बी कि निश्‍चय होगी हार! महापालिकेच्या फूड बास्केट योजनेबद्दल अभिनंदन.

Union Minister Mansukh Mandaviya's tweet about the food basket scheme for tuberculosis patients by the Municipal Corporation.
Jalgaon News: नीलकमल रुग्णालयाजवळील अतिक्रमण हटवले

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे महापालिकेच्या कामात एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. राम रावलांनी यांनी केंद्र सरकारने महापालिकेच्या कार्याचे कौतुक केल्यामुळे चांगले काम करण्यासाठी आमच्या आरोग्य यंत्रणेला अधिक बळ मिळाले आहे, अशी भावना व्यक्त केली.

Union Minister Mansukh Mandaviya's tweet about the food basket scheme for tuberculosis patients by the Municipal Corporation.
Jalgaon News : भटक्या श्‍वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com