Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unseasonal rain caused heavy damage to agricultural crops amalner jalgaon news

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

वावडे (जि. जळगाव) : तालुक्यातील वावडेसह परिसरात सोमवारी (ता.६) रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Unseasonal rain caused heavy damage to agricultural crops amalner jalgaon news)

तालुक्यात वावडे,जवखेडे, मांडळ,मुडी, लोण,भरवस आदी भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यास सुरवात झाली.

विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाळा सुरवात झाली.वादळी वाऱ्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. गहू,हरभरा,मका,केळी टमाटे,आदी शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

वादळ आणि पावसामुळे ठीक ठिकाणी काढणीला आलेले गहू,हरभरा मका,पुर्णतः जमीनदोस्त झाली आहेत.तसेच केळी झाडे कोलमडून पडली आहेत.त्याला फटका बसला आहे. काही ठिकाणी कमकुवत झाडांच्या फांद्या देखील तुटून रस्त्यावर पडल्या आहे.