Unseasonal Rain : 2 दिवसांत पावणेदोन हजार हेक्टरवर नुकसान; अवकाळीचा फटका

Heavy Rain Crop Damage
Heavy Rain Crop Damageesakal

Unseasonal Rain : शहरासह जिल्ह्यात २८ व २९ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण एक हजार ७३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान केळी, मका, कांदा पिकांचे झाले आहे. मुक्ताईनगर व चोपडा या दोन तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain Damage to over two thousand hectares in 2 days Bad weather jalgaon news)

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. बेळी, नशिराबाद परिसरात अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. वीजतारा तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. केव्हा अवकाळीचा चक्र थांबणार, अशी चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.

जिल्ह्यात आतापर्यंतच्या अनुभवानुसार मे महिन्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसतो. मात्र, यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व वादळ झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ‘ग्लोबल वार्मिंग’ व ‘अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाळ्यात पाऊस पडत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Heavy Rain Crop Damage
Dhule Agriculture News : रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषी यंत्रणेची माहिती

तापमान झाले कमी

उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. यंदा अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्याचे तापमान ४० अंशांच्या आतच राहिले. आगामी काही दिवसही पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत राहील.

जळगाव जिल्ह्यात ‘मे’चे तापमान ४४ ते ४५ अंशांदरम्यान असते. मात्र, अवकाळी पावसाने तापमानाची तीव्रता कमी करून नागरिकांना दिलास दिला असला तरी पीक, घरांचे नुकसान होत आहे.

तालुकानिहाय नुकसान असे

तालुका --- नुकसान (हेक्टर)

चोपडा -- ७२०.२०

पाचोरा -- ८.७०

बोदवड -- ५८.००

भुसावळ -- १.८०

मुक्ताईनगर -- ७०७.००

जळगाव -- ८०.९०

यावल -- १५३.४५

एकूण -- १७३०.०५

Heavy Rain Crop Damage
Nashik Crime News : सलग 2 दिवस एकाच घरात चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com