esakal | जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने पार केला दोन लाखांचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने पार केला दोन लाखांचा टप्पा

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने पार केला दोन लाखांचा टप्पा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. १४) दोन लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एक लाख ९५ हजार २१४ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस, तर २२ हजार ८५४ नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती केंद्र शासनाच्या कोविन पोर्टलवर देण्यात आली.

१६ जानेवारीपासून प्रारंभ

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांचे, ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

या केंद्रांवर लसीकरण

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालये अशा एकूण १३३ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.

तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू

गेल्या आठवड्यात लसींचा साठा संपला होता. लसीकरणास मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे अतिरिक्त साठ्याची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच ४० हजार डोस प्राप्त झाले आहेत.

असे झाले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ८४० हेल्थ केअर वर्कर्सनी पहिला व ११ हजार ३३६ व्यक्तींनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. तर १८ हजार ७७१ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला व ५ हजार ८५० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर ४५ वर्षावरील १ लाख ५२ हजार ६०३ नागरिकांनी पहिला व ५ हजार ६६८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असल्याची आकडेवारी कोविन पोर्टलवर देण्यात आली आहे.