Jalgaon Crime News : विवीध ठिकाणांहुन 3 वाहनांची चोरी | various places 3 Theft of vehicles Jalgaon Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : विविध ठिकाणांहुन 3 वाहनांची चोरी

Jalgaon News : जळगाव शहरातील कोल्हेनगर, गोलाणी मार्केट पार्कींग आणि टॉवर चौकातील प्रभात सोडा फाऊंटन अशा तिन ठिकाणांहुन चोरट्यांनी तीन मोटारसायकली चोरुन नेल्या.

या प्रकरणी रामानंदनगर, शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारींवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (various places 3 Theft of vehicles Jalgaon Crime News)

घरासमोरुन वाहन चोरी

कोल्हेनगरातील निरज संजय ढाके (वय २३, मुळ रा. साळवा, ता. धरणगाव) यांनी गेल्या बुधवारी (ता. ३१) रात्री घरासमोर नेहमीच्या जागी आपली दुचाकी (एमएच १९, डीके ६४७) उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरुन नेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रेवानंद साळुंखे तपास करीत आहेत.

अर्ध्या तासात वाहन लंपास

शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी चंदर दिलीपकुमार सचदेव (वय ३५) हा तरुण बॅटरी सर्विसिंगचे काम करून उदरनिर्वाह करतो. गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदर हा त्याची ॲक्टीवा (एमएच १९, सीटी ४१४) घेऊन गोलाणी मार्केट येथील अमर रगडासमोर आला होता.

पार्कींगमध्ये उभी केलेली त्याची दुचाकी अर्ध्याच तासात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक किशोर निकुंभ तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्याची दुचाकी लंपास

शंकरवाडी रिंग रोड येथील रहिवासी ललीत भास्कर चौधरी (वय ५०) हे शेती व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता. २) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९, एपी ७९२५)द्वारे टॉवर चौकातील प्रभात सोडा फाऊंटन येथे आले होते.

पार्कींगमध्ये उभी दुचाकी चोरट्याने अलगदपणे लंपास केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस नाईक गजानन बडगुजर तपास करत आहेत.

टॅग्स :JalgaoncrimeVehicle