
Jalgaon Vatpornima News : महिलांनी केली वटपौणिमेची पूजा; वडाच्या झाडाला दोरा बांधून पतीसाठी प्रार्थना
Jalgaon News : वटसावित्रीची कथा सर्वांनाच ठाउक आहे. सावित्रीने आपल्या तपाने साक्षात यमाच्या दारातून पतीला परत आणल्याची आख्यायीका आहे.
तेव्हापासून वटसावित्री पौणिमेचे व्रत महिला, युवती मनोभावे करतात.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ३) शहरातील अनेक भागातील महिलांनी वडाच्या झाडाला मंत्रेाच्चारासह दोरा गंडाळून, मनोभावी पूजा करत पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. (Vatpaunima worshiped by women Prayer for husband by tying rope to banyan tree Jalgaon News)
वटसावित्री पौर्णिमेस महिला उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर प्रसाद ग्रहण करतात. शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, चिमुकले राम मंदिर व विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांची पूजा महिलांनी केली.
पूजेचे ताट घेवून व नवीन वस्त्रे परिधान करून महिला पुजेला आल्या होत्या. दरम्यान, वटसावित्रीच्या पूजेसाठी लागणारे आंबे, विविध प्रकारची फुले, पेढा, हळद, कुंकू आदी साहित्यांना आज मोठी मागणी होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?