Accident News: ह्रदय हेलवणारी घटना! वडिलांचे पार्थिव गावाकडे घेवून जाताना मुलाचा दुर्दैवी मृत्यू

उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थीव गावाकडे नेत असता दुचाकीने जात
Accident News
Accident Newsesakal

मूर्तिजापूर : तालुक्यात अपघात प्रवण स्थळ म्हणून घोषित झाल्या सारखे सिरसो येथे अविरत अपघाताची मालिका सुरूच असून, आज पहाटे वडिलांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने रेपडखेड येथील युवकाने वडिलांना उपचाराकरिता मूर्तिजापूर येथे आणले असता, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थीव गावाकडे नेत असता दुचाकीने जात असलेल्या मुलाच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिल्याने त्याचा सुद्धा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची ह्रदय हेलवणारी घटना ता. ३ जून रोजी सकाळी सिरसो फाट्याजवळ घडली.

Accident News
Nagpur :नागपूरात शंभरावर उद्यानांचा होणार कायापालट

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ जानराव जमनिक (वय ४५ रा.रेपाडखेड) यांच्या वडिलांना आज शनिवारी ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारार्थ मूर्तिजापुरात आणले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

त्यांचे पार्थीव गावाकडे पाठवून स्वतः अंतिम संस्काराचे साहित्य मागून दुचाकी क्रमांक एमएच-३०-व्ही-३८७८ ने गावाकडे जात असताना दर्यापूरकडून विरुद्ध दिशेने भरधाव येणारा टिप्पर क्रमांक एमएच-२७-बीएक्स-०१९३ च्या निष्काळजीपणे चालवून सिद्धार्थच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने सिद्धार्थ गंभीर जखमी झाले.

Accident News
Nagpur : गद्दारांना धडा शिकवा; ओबीसी आरक्षणाच्या आश्‍वासानाचे काय ; अजित पवार

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद पांडव, गजानन थाटे, श्री. रडके घटनास्थळी रवाना झाले. जखमी अवस्थेत सिद्धार्थ यांना मूर्तिजापुरातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु, उपचारा दरम्यान त्यांची सुद्धा प्राणज्योत मालवली. पुढील तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com