Vegetable Rate Hike : भाजीपाला कडाडला; गृहिणींचे बजेट कोलमडले

vegetable price hike
vegetable price hikeesakal

Vegetable Rate Hike : तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील सोमवारच्या आठवडी बाजारात जवळपास तीस गावातील ग्रामस्थ येत असतात.

या आठवड्यात बाजारात भाजीपाला कडाडल्याचे चित्र होते. शंभर रुपये ते साठ रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करण्यात आली. (vegetable rate hike in Monday weekly market at Amalner jalgaon news)

अमळनेर येथील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून आले. यामध्ये मिरची १२० प्रतिकिलो, मेथी १६०,पालक ८०, फुलगोबी ८० शेवगा १००, टमाटे १२०, चवळी १२०, भोपळा ६०, कोथिंबीर १६०, देव डांगर ६०, कारले ८०, तुरई १२०, भेंडी ८०, मूग शेंगा १२०, वांगी ८०, बटाटे ४०, कांदे २०, अद्रक २००, रताळू ४०, गवार १२० असे दर होते.

दरम्यान, व्यापारी म्हणाले, की अमळनेर येथील आठवडी बाजारात टोमॅटो प्रति कॅरट १४०० प्रमाणे तर शेवगा ५० रुपये प्रमाणे खरेदी करून आणला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

vegetable price hike
Jalgaon Municipality Scheme : ...तर घरपट्टीत 5 टक्के सूट; महापालिकेची योजना

त्यामुळे टोमॅटो १०० रुपये तर शेवगा ८०/१०० रुपये प्रमाणे विक्री करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाण का होईना मोठ्या प्रमाणात पैसे नफा मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

"अमळनेर बाजारात फुलकोबी विक्रीसाठी आणली होती. ६० रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे बऱ्यापैकी पैसे मिळाले." - भगवान महाजन, शेतकरी

vegetable price hike
Jalgaon News : मिश्र खत विक्री प्रकरणी 4 केंद्रांची तपासणी; परवाना रद्दचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com