पोलिसांना पाहून दचकले अन्‌ कोठडीत पोचले; दुचाकी चोरटे गजाआड | Latest crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

पोलिसांना पाहून दचकले अन्‌ कोठडीत पोचले; दुचाकी चोरटे गजाआड

जळगाव : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. रोजच वाहन चोरीचे गुन्हे दाखल होऊनही गुन्हे कमी होण्याचे नाव घेईना. एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा वाहने चोरणारी टोळी अटक केली असून त्यांनी चार पैकी तीन दुचाकी काढून दिल्या आहेत. (latest crime news)

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सूचनेवरून वाहन चोरट्यांचा शोध घेत असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना वाहन चोरट्यांची गुप्त माहिती मिळाली. सहाय्यक फौजदार आनंद पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, विकास सातदिवे, किशोर पाटील यांच्या पथकाने माहितीचा पाठपुरावा करून निक्की नंदलाल मिश्रा (रा. गांधीनगर, भुसावळ) व शुभम सुनील पाटील (रा. शिरपूर कन्हाळा रोड, भुसावळ) अशा संशयितांना अटक केली.

हेही वाचा: एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे चोरटा सांगतोय त्याचे कार्यक्षेत्र...

पोलिस पाहून भंबेरी

अजिंठा चौकात नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी सुरु असतानाच भुसावळकडून जळगावकडे आलेले दोघे भामटे पोलिस पाहून दचकले. पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडल्यावर दोघांच्या जवळील दुचाकी चोरीची निघाली. अधिक चौकशीत दोघेही अट्टल वाहनचोर असल्याचे निष्पन्न होउन त्यांनी इतर २ अशा एकूण तीन मोटारसायकली काढून दिल्या असून चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अटकेतील भामटा निक्की याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल असून त्याचा साथीदार शुभम याच्यावर दोन गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून इतर आणखी चोरीच्या मोटारसायकली जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: साहेब, शूटिंग चालू आहे, पावती फाडा; टोइंग कर्मचाऱ्यांचा इशारावजा संदेश

Web Title: Vehicle Thieves Arrested In Jalgaon Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..