Jalgaon News : केंद्र व राज्याच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी : विजय चौधरी

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी.
State General Minister Vijay Chaudhary office bearer on platform while speaking at BJP meeting
State General Minister Vijay Chaudhary office bearer on platform while speaking at BJP meetingesakal

Jalgaon News : गाव चलो अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा महाविजयात खारीचा वाटा असेल, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी यांनी येथे केले. (Vijay Chowdhury statement Information about schemes of center and state should be conveyed from house to house jalgaon news)

जळगाव शहरातील ब्राम्हण सभा येथे सोमवारी दुपारी भाजपतर्फे गाव चलो अभियान कार्यशाळेत ते बोलत होते. खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या प्रदेश सचिव शालिनीताई बुंदे.

जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन, समन्वयक अजय भोळे, गोविंद अग्रवाल आदी व्यासपीठावर होते.

श्री चौधरी यांनी केंद्र व राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. ते त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे अवाहन केले.

State General Minister Vijay Chaudhary office bearer on platform while speaking at BJP meeting
Jalgaon News : निंभोरा येथील इतिहासात प्रथमच देहदान

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे तसेच अमोल जावळे आणि डॉ. राधेश्याम चौधरी यांनी कार्यक्षेत्रातील भाजपच्या नमो चषक, नमो ॲप, सरल ॲप, दिवार लेखन, संघटनात्मक बांधणी, वस्ती व पाडा संपर्क अभियान, नवीन पक्ष प्रवेश, बूथ रचना आदी विषयांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. डॉ. चौधरी यांनी गाव चलो अभियानाची पीपीटी सादर केली. आमदार भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

अभिनंदन ठराव

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याचे सांगण्यात आले.

तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनात यशस्वी मध्यस्थीचे श्रेय राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना देऊन दोघांच्या अभिनंदनाचा ठराव प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मांडला. त्यास उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.

State General Minister Vijay Chaudhary office bearer on platform while speaking at BJP meeting
Jalgaon News : जिल्हा बँकेला साखर कारखान्यांच्या थकहमीसाठी समिती : संजय पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com