Vikrant Mishra Accident : मिश्रा कुटुंबीयांसाठी डायमंड ग्रुपचे सदस्य मैदानात

Members of the Diamond group sitting in front of the collector's office.
Members of the Diamond group sitting in front of the collector's office.esakal
Updated on

जळगाव : येथील विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) याचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अपघातास कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाचे पालक तथा कारमालक यांना अटक करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डायमंड्स व्हाट्सॲप गृपतर्फे शुक्रवारी (ता. २) धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येऊन कारच्या मालकाला अटक करण्याची मागणी करण्यात आली. (Vikrant Mishra Accident death case Diamond Group members in help for Mishra family jalgaon Latest Marathi News)

Members of the Diamond group sitting in front of the collector's office.
Nashik : सोनसाखळी चोरट्यासह सराफास अटक; 3 गुन्हे उघड

कारचा मालक संशयित आरोपी व अल्पवयीन मुलाचा बाप मोहम्मद सलीम मोहम्मद मोबीन शहा (रा. जळगाव) हा घटनेपासून फरार असून त्याने अद्याप पोलीसांना तपासात कोणतीही मदत केलेली नाही. संशयित आरोपीने जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

त्यापूर्वी पोलिस विभागाचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा सरकारी वकील यांनी कटाक्षाने बाजू मांडावी. संशयित आरोपी कार मालकास अटक होऊन पोलिस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी करण्यात आली. डायमंड ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटना, नागरिकांनी यात सहभाग घेतला.

Members of the Diamond group sitting in front of the collector's office.
‘इंग्रजीला ‘वाघिणीचं दूध’ म्हणणारे मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com