ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच घेताना अटक; ACBची कारवाई

ठेकेदाराकडून गटार व ढापे बांधण्याच्या कामाचे बिल मंजुरीसाठी केली होती मागणी.
Bribe
Bribeesakal
Updated on

चोपडा (जि. जळगाव) : ठेकेदाराकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गटार व ढापे बांधण्याच्या कामाचे बिल मिळण्यासाठी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक केली आहे. ही घटना चोपडा - शिरपूर रस्त्यावरील हॉटेल जयेशवर सोमवारी (ता. ९) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान घडली.

तालुक्यातील वर्डी येथे पंधराव्या वित्त आयोगांतर्गत निधीतून गटार व ढापे बांधण्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. मात्र या कामाचे बिल मिळण्यासाठी वर्डी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहिदे (रा. बोरोलेनगर २, चोपडा, ग्रामपंचायत वर्डी, ता. चोपडा) यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामाचे बिल अदा करणेकामी १२ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ११ हजार देण्याचे ठरले.

Bribe
जळगाव : कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारा ट्रक पकडला; 2 वासरू मृत

ग्रामविकास अधिकारी यांच्या मागणीनुसार सोमवारी (ता. ९) चोपडा- शिरपूर रस्त्यावरील हॉटेल जयेशवर ग्रामविकास अधिकारी भगवान पांडुरंग यहिदे यास ठेकेदाराकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. सापळा कार्यवाही दरम्यान यहिदे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, श्री.मोरे, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Bribe
राज्यातील शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न सुटणार; शासनातर्फे निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com